|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रंथालयास आर्थिक मदत

कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रंथालयास आर्थिक मदत 

प्रतिनिधी/ सातारा

ज्येष्ठ मार्क्सवादी नेते कॉ.प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या जयंतीनिमित्त कुसवडे (ता. सातारा) येथील विजय मांडके सार्वजनिक ग्रंथालयाला एक लाख रुपयांचा धनादेश मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रा. अजित अभ्यंकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर, कॉ. वसंत नलावडे उपस्थित होते.

विजय मांडके सार्वजनिक ग्रंथालय कुसवडेच्यावतीने अध्यक्ष महेश गुरव, लखन जगताप, विक्रम बल्लाळ, समाधान दळवी, आकाश सराटे, योगेश गुरव यांनी धनादेश स्वीकारला. ग्रंथालयाच्या वतीने कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर समाज विज्ञान केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती महेश गुरव यांनी दिली.  

कॉ. महाबळेश्वरकर यांच्या जंयतीनिमित्त सातारा येथे प्रा.अजित अभ्यंकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थे समोरील आव्हाने या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रंथालयाला मदतीचा धनादेश देण्यात आला. या कार्यक्रमाला विजय मांडके, डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर, प्रा.पुरुषोत्तम शेठ, किशोर बेडकिहाळ, मिनाज सय्यद, ऍड.राजेंद्र गलांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ग्रंथालयाच्यावतीने उभारण्यात येणाऱया समाज विज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी मदत करण्याचे आवाहन लखन जगताप आणि विक्रम बल्लाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Related posts: