|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माजी विद्यार्थ्यांनी शाळेबरोबर गावच्या विकासासाठी योगदान द्यावे

माजी विद्यार्थ्यांनी शाळेबरोबर गावच्या विकासासाठी योगदान द्यावे 

प्रतिनिधी/ वडूज

चितळी (ता. खटाव) येथील नवमहाराष्ट्र विद्यालयातील 1983-84 च्या माजी विद्यार्थ्यांनी 35 वर्षांनी स्नेहमेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना माजी पोलीस महासंचालक रामराव पवार यांनी हा मेळावा कौतुकास्पद आहे असे  सांगितले. तसेच माजी विद्यार्थ्यांनी शाळेबरोबर गावच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.

 याप्रसंगी सरपंच, उपसरपंच तसेच माजी प्राचार्य बी. बी. पवार, एच. बी. पवार, पी. बी. तारळेकर, एम. आर. महामुनी, खेतमर तसेच सन1983-84 सालच्या एस.एस.सी. बँचचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.                                    

माजी शिक्षक पांडुरंग तारळेकर, महादेव महामुनी व खेतमर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभाशीर्वाद दिले तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी 35 वर्षांनी स्नेहमेळावा आयोजित करुन जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. यानंतर 1983-84 च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनीही मनोगत व्यक्त केले. लालासाहेब पवार यांनी व त्यांच्या सहकाऱयांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. आभार सुनील गवरे यांनी मानले.                                                             

Related posts: