|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वचननाम्याची पाच वर्षांत 100 टक्के पूर्तता करणार

वचननाम्याची पाच वर्षांत 100 टक्के पूर्तता करणार 

राजेश भिसे /नवारस्ता

गेल्या पाच वर्षात राज्यातील युती शासनाने घेतलेल्या पाटण मतदार संघातील  धोरणात्मक निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आपला पहिल्या वर्षात अधिक भर राहणार असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटण मतदार संघातील जनतेला दिलेल्या वचननाम्यांची येत्या पाच वर्षात 100 टक्के पूर्तता करणार असल्याचा संकल्प आपल्या 53 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आमदार शंभूराज देसाई यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.

 आमदार देसाई म्हणाले, भाजप सेनेच्या युती शासनाने गेल्या पाच वर्षात पाटण मतदार संघात मोठय़ा प्रमाणात विकासकामे आणि महत्वकांक्षी धोरणात्मक निर्णय घेतले. त्या सर्व धोरणात्मक निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आपला पहिल्या वर्षात भर राहणार असून सन 2014 मध्ये निवडणुकीत आपण पाटण मतदार संघातील जनतेला दिलेल्या वचननाम्या पैकी काही वचननामे निवडणुकीची आचारसंहिता, त्याआधीची पूरपरिस्थिती आणि निवडणुकी नंतरचा अवकाळी पाऊस याकारणामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे थोडय़ा प्रमाणात राहिलेली अपूर्णता पूर्ण करण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहोत. यावेळी 2019 च्या निवडणुकीत पाटण मतदार संघातील जनतेला दिलेली वचननामे 100 टक्के पूर्ण करण्यासाठी आपण वचनबद्ध आहे, असे स्पष्ट करून आमदार देसाई म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाटण मतदार संघात 5 टक्के कमी मतदान होऊनही मतदारांनी मला पुन्हा ‘जनतेचा सेवक’ म्हणून संधी दिली. जनतेने दिलेल्या संधीचे गतवेळी ही सोने केले आणि यावेळी ही गतवेळेपेक्षा अधिक वेगाने संधीचे सोने करण्यासाठी आपण वचनबद्ध राहणार आहोत. तसेच 2018/19 आणि 2019/20 या आर्थिक वर्षात पाटण मतदार संघात मोठय़ा प्रमाणात विकासकामे मंजूर झाली. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप ही काही कामे मंजूर असूनही प्रलंबित आहेत ती सर्व प्रलंबित मंजूर विकासकामे पुन्हा तातडीने सुरू करण्यासाठी पाटण मतदार संघातील प्रशासनाला आपण सूचना दिल्या असून ती सर्व विकासकामे तातडीने सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

   गेल्या 5 वर्षात पाटण मतदार संघात अनेक धोरणात्मक आणि जनतेच्या हिताचे निर्णय करून घेण्यात आपल्याला यश मिळाले आहे. यामध्ये भूकंपग्रस्त दाखले, एकाच वेळी मंजूर झालेल्या तालुक्यातील 118 नळ पाणीपुरवठा योजना, तारळी धरणातून 50 मीटरच्या वर 3 हजार एकर क्षेत्राला पाणी देण्याचा निर्णय, मोरणा प्रकल्पाच्या वाढीव क्षेत्रासाठीचा सर्वे आहे.

   गेल्या 25 वर्षात डोंगर पठारावरील ज्या गावांना बारमाही रस्ते नव्हते अशा गावांत डांबरी बांधण्यात आपणाला यश मिळाले. हे केवळ आपल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात पूर्ण करता आले याचे आपणास मनोमन समाधान असल्याचे व्यक्त करून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या काळातील राज्यभर असलेला दरारा आणि नावलौकिक कायम ठेण्यासाठी आणि आपण प्रयत्न करणार  आहे. गाव तेथे रस्ता ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून ‘विकासाभिमुख तालुका’ करण्याचा संकल्प आमदार देसाई यांनी शेवटी व्यक्त केला.

Related posts: