|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » जम्मू-काश्मीरमध्ये स्फोट सैनिक हुतात्मा, 2 जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये स्फोट सैनिक हुतात्मा, 2 जखमी 

जम्मू :

जम्मू-काश्मीरच्या अखनूर जिल्हय़ात रविवारी झालेल्या स्फोटात एक सैनिक हुतात्मा झाला आहे. सैनिकांचे पथक ट्रकमधून प्रवास करत असताना हा स्फोट घडविण्यात आला आहे. या स्फोटात सापडल्याने ट्रकमधून प्रवास करणारे 2 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत.

अखनूर नियंत्रण रेषेनजीक पल्लनवाला भागात हा स्फोट घडला आहे. स्फोटात जखमी तिन्ही सैनिकांना उत्तर कमांडच्या सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान यातील एका सैनिकाने अखेरचा श्वास घेतला आहे.

उधमपूर येथील सैन्य रुग्णालयात दाखल सैनिकांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याचबरोबर स्फोट झालेल्या ठिकाणी सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्सच्या पथकाने सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱयांसोबत तपास सुरू केला आहे. या स्फोटाबद्दल सैन्याकडून अद्याप कुठलेच विधान प्रसारित करण्यात आलेले नाही. या स्फोटानंतर परिसरातील सुरक्षा वाढवत नाकाबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली आहे.

जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून दहशतवादी खोऱयात हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. खोऱयातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना दहशतवादी भीती पसरविण्याचा कट रचत आहेत.

Related posts: