|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » नक्षलींच्या हाती लागले ड्रोन

नक्षलींच्या हाती लागले ड्रोन 

नवी दिल्ली

: नक्षलवादी संघटनांच्या हाती ड्रोन लागल्याने सरकार सतर्क झाले आहे. ड्रोन दिसून येताच ते पाडविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सुरक्षा तसेच गुप्तचर यंत्रणांच्या केंद्रीय कमांडकडून हा निर्देश देण्यात आला आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्हय़ात सीआरपीएफ तळावर ड्रोन घोंगावल्याचे समोर आल्याने हा निर्देश देण्यात आला आहे. ‘लाल आणि पांढऱया रंगाचा प्रकाश उत्सर्जित करणारा ड्रोन’ मागील महिन्यात किमान 4 वेळा किस्ताराम आणि पालोडीमध्ये सीआरपीएफ तळानजीक उडताना दिसून आला होता. ड्रोनच्या आवाजाने जवानांचे लक्ष वेधून घेतल्यावर सतर्कता बाळगण्यात आली होती.

ड्रोनला लक्ष्य करत पाडविण्यापूर्वीच ते आकाशातून गायब झाले होते. हा घटनाक्रम पाहता सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. या तपासाचे धागेदोरे मुंबईतील एका दुकानदारापर्यंत पोहोचले आहेत. या दुकानदाराने अज्ञात लोकांना ड्रोन्सची विक्री केली होती.

सीआरपीएफ तळांची सुरक्षा

 ड्रोन दिसून आलेल्या दोन तळांबद्दल चिंता वाढली आहे. या दोन्ही तळांच्या परिसरात नक्षलवाद्यांचा वावर नेहमीच दिसून येतो. या भागाच्या सीमा ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या जंगलाला लागून आहेत.

Related posts: