|Saturday, December 7, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्वचषक नेमबाजी स्पर्धेला चीनमध्ये उद्या प्रारंभ

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेला चीनमध्ये उद्या प्रारंभ 

वृत्तसंस्था/  पुतियान

चीनमध्ये मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या 2019 च्या हंगामातील शेवटची विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत ऑलिंपिकमध्ये होणाऱया 10 विविध नेमबाजी प्रकारात भारताचे नेमबाजी सहभागी होत आहेत. या स्पर्धेत 14 जणांचा भारतीय नेमबाजचा संघ चीनमध्ये दाखल झाला आहे. भारतीय नेमबाज या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय शुटींग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) या वार्षिक स्पर्धेत रायफल आणि पिस्तुल नेमबाजी प्रकारात जगातील विविध देशांचे अव्वल नेमबाज सहभागी होत आहेत. याच धर्तीवर गेल्या ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये शॉटगन स्पर्धा घेतली गेली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय नेमबाज संघाला जसपाल राणा यांचे मार्गदर्शन मिळत आहे. पुरूषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन या प्रकारात संजीव रजपूत आणि अखिल शेरॉन भारताचे प्रतिनिधीत्व करतील तर महिलांच्या विभागात अंजूम मुदगील या क्रीडा प्रकारात सहभागी होत आहेत. महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात भारताचे चार स्पर्धक भाग घेत आहेत. गेल्यावर्षी ही स्पर्धा दक्षिण कोरियात घेण्यात आली होती. तत्कालीन स्पर्धेत भारताच्या अंजूम मुदगीलने रौप्यपदक मिळविले होते तर अपूर्वी चंडेलाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

Related posts: