|Friday, January 24, 2020
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऍगर जखमी

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऍगर जखमी 

वृत्तसंस्था/ अडलेड

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज ऍस्टोन ऍगरच्या नाकाला झेल टिपताना दुखापत झाली. त्याच्या नाकाच्या भागावर या दुखापतीमुळे टाके घालावे लागले आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

येथे मार्श चषक वनडे क्रिकेट स्पर्धेतील पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळविला गेला होता. ऍगर पश्चिम ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत होता. दक्षिण ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाज तसेच ऍस्टोनचा भाऊ वेस याने उंच फटका मारला त्यावेळी ऍस्टोन मिडॉनच्या देशेने धावत जात झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि डोळे आणि नाक यांच्यात मध्यभागी तो आदळला. ऍस्टोनच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्याच्यावर रूग्णालयात तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले.

Related posts: