|Thursday, December 5, 2019
You are here: Home » क्रिडा » युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी जर्मनी, क्रोएशिया पात्र

युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी जर्मनी, क्रोएशिया पात्र 

वृत्तसंस्था/  मॉनचेनग्लेडबॅच

2020 साली होणाऱया युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी जर्मनी आणि क्रोएशिया यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. शनिवारी झालेल्या पात्र फेरीच्या सामन्यात जर्मनीने बेलारूसचा 4-0 अशा गोलफरकाने पराभव केला. त्याच प्रमाणे क्रोएशियाने स्लोव्हाकियावर 3-1 अशी मात केली.

शनिवारच्या सामन्यात बेलारूसच्या तुलनेत जर्मनीचा खेळ अधिक दर्जेदार आणि आक्रमक झाला. 41 व्या मिनिटाला बचावफळीतील मथायस जिंटेरने जर्मनीचे खाते उघडले. जर्मनीचा दुसरा गोल गॉरेटिकाने तर तिसरा गोल प्रुसने केला. प्रुसने 75 व्या मिनिटाला जर्मनीचा चौथा तर वैयक्तिक दुसरा गोल करून बेलारूसचे आव्हान संपुष्टात आणले. पात्र फेरीच्या या स्पर्धेत क गटात जर्मनीने 18 गुणांसह पहिले स्थान राखले आहे. त्यांनी सहा सामने बरोबरीत सोडविले असून तर एक सामना गमविला आहे. या गटात हॉलंड 16 गुणांसह दुसऱया आणि नॉर्दनआयर्लंड 14 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.

इ गटातील सामन्यात क्रोएशियाने स्लोव्हाकियाचा 3-1 असा पराभव केला. या गटात क्रोएशियाने 8 सामन्यांतून 17 गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे. हंगेरी 12 गुणांसह दुसऱया आणि वेल्स 10 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. 2020 साली होणाऱया युरो चषक फुटबॉल स्पर्धेत 24 संघांचा सहभाग राहील. या स्पधेंत जर्मनीने सलग 13 वेळा आपली पात्रता सिद्ध केली आहे.

Related posts: