पॅनासोनिक गोल्फ स्पर्धेत किम विजेता

वृत्तसंस्था / नुह (हरियाणा)
रविवारी येथे झालेल्या पॅनासोनिक खुल्या इंडिया आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत कोरियाच्या किमने 13-अंडर-सरासरी 203 गुण नोंदवित विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत भारताच्या शिवकपूर आणि एस.चिक्करंगाप्पा यांनी संयुक्त दुसरे स्थान पटकाविले.
या स्पर्धेतील शेवटच्या फेरीमध्ये शिवकपूर आणि चिक्करंगाप्पा यांनी प्रत्येकी समान 67 गुण नोंदविले. या दोन्ही भारतीय गोल्फपटूंनी या स्पर्धेत 12-अंडर 204 गुणांसह संयुक्त दुसरे स्थान मिळविले. भारताच्या विक्रांत चोप्राला पाचव्या तर अलावतला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
Related posts:
Posted in: क्रिडा