|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » हाँगकाँग ओपनमध्ये ली च्युक, चेन युफेईला जेतेपद

हाँगकाँग ओपनमध्ये ली च्युक, चेन युफेईला जेतेपद 

वृत्तसंस्था/ हाँगकाँग सिटी

येथे झालेल्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात हाँगकाँगच्या ली च्युकने तर महिला गटात चीनच्या युफेईने विजेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, 23 वर्षीय ली च्युकचे हे कारकिर्दीतील पहिलेच जेतेपद ठरले आहे.

रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात हाँगकाँगच्या च्युकने इंडोनेशियाच्या गिटिंगचा 16-21, 21-10, 22-20 असा पराभव केला. 63 मिनिटे चाललेल्या या रोमांचक सामन्यात च्युकने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. प्रारंभी, गिटिंगने आक्रमक सुरुवात करत पहिला गेम 21-16 असा जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली होती. यानंतर, च्युकने मात्र जोरदार पुनरागम करत दुसरा व तिसरा गेम जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, हाँगकाँगच्या या युवा खेळाडूने डेन्मार्कचा अव्वलमानांकित व्हिक्टर ऍक्लससेन व भारताच्या किदाम्बी श्रीकांतला नमवण्याची किमया साधली होती.

महिला एकेरीत चेन युफेई अजिंक्य

चीनच्या चेन युफेईने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या रेचनॉक इंटेनॉनचा 21-18, 13-21, 21-13 असा पराभव केला. 55 मिनिटे चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंत चांगलीच चुरस पहायला मिळाली. विशेष म्हणजे, युफेईचे हे यंदाच्या वर्षातील पहिलेच विजेतेपद ठरले आहे.

Related posts: