|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात मध्यवस्तीतील जुगार अड्डय़ावर छापा

साताऱयात मध्यवस्तीतील जुगार अड्डय़ावर छापा 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या बुधवार पेठेत शनिवारी सायंकाळी सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस कार्यालय व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने जुगार अड्डय़ावर छापा टाकला. या कारवाईत सहाजणांना अटक करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल मोटारसायकल असा एकूण 1 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हा छापा पडताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दीही केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार नाका येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलिसांचे पथक तयार करुन घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यातील बहुतेक संशयित हे बुधवार पेठेतीलच होते. यामुळे परिसरात काही काळ गोंधळ झाल्याने तणाव निर्माण झाला.

या कारवाईत बुधवार पेठेतील एका सर्व्हिसिंग सेंटरच्या पाठीमागील पत्राच्या शेडमध्ये सनी धनाजी भिसे वय 22, शिवम विनोद कांबळे वय 22,  मनोज संपत माने वय 44, अजय सदाशिव आवळे वय 30, शामराव यशवंत कुऱहाडे वय 40 (सर्व रा. 259 व 270, बुधवार पेठ, सातारा) आणि सोमनाथ मारुती वायदंडे, वय 36, रा. कवठीखेड, ता. खंडाळा) हे जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करुन त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल मोटारसायकल असा एकूण 1 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व त्यानंतर सर्वांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत उपविभागीय पोलीस कार्यालयातील हवालदार बालम मुल्ला यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अंकुश यादव, मंगेश डोंबे, शैलेश फडतरे, हसन तडवी यांनी कारवाईत सहभाग घेतला. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हय़ाची नोंद झाली असून पोलीस नाईक कुंभार पुढील तपास करत आहेत.::

Related posts: