|Thursday, December 12, 2019
You are here: Home » leadingnews » आजपर्यंतचा संसदेचा प्रवास प्रेरणादायी : नरेंद्र मोदी

आजपर्यंतचा संसदेचा प्रवास प्रेरणादायी : नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आजपर्यंत संसदेची परंपरा आणि प्रवास प्रेरणादायी होता. आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या सत्रात काही वाद-विवाद होतील, मात्र, चांगल्या चर्चा व्हाव्यात, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

संसंदेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मोदींनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. मोदी म्हणाले, यंदा संविधानाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत.  26 नोव्हेंबरला संविधान दिवस आहे. आजपर्यंतचा संसदेचा प्रवास प्रेरणादायी होता. 2019 मधील हे शेवटचे सत्र आहे आणि शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे या सत्रात काही वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. तरी देखील चांगल्या चर्चा व्हाव्यात, अशी आशा बाळगतो, असेही मोदी म्हणाले.

Related posts: