|Sunday, January 26, 2020
You are here: Home » leadingnews » सरकार बनवण्याबाबत शिवसेना-भाजपला विचारा : शरद पवार

सरकार बनवण्याबाबत शिवसेना-भाजपला विचारा : शरद पवार 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली  : 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधनाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सरकार बनवण्याबाबत शिवसेना आणि भाजपला विचारा, असे सांगत पवारांनी पुन्हा गुगली टाकली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीत गेलेले शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधीनी सरकार स्थापनेबाबत प्रश्न विचारला, त्यावेळी पवार बोलत होते. पवारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

पवार म्हणाले, शिवसेना – भाजप एकत्र निवडणूक लढली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहे. त्यामुळे सत्तास्थापनेबद्दल भाजप शिवसेनेला विचारा.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज दिल्लीत होत असलेल्या भेटीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रात सध्या सत्तासंघर्षाची कोंडी फुटण्याच्या दृष्टीने, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातली आजची भेट महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी अनुकूल आहे. तर राज्यात शिवसेनेसोबत जाऊन सत्तास्थापन करण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या अजून चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी भेटीत चर्चा होऊन, निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

Related posts: