|Friday, December 13, 2019
You are here: Home » Top News » धोनीमुळे माझे वर्ल्डकपमधील शतक हुकले : गौतम गंभीर

धोनीमुळे माझे वर्ल्डकपमधील शतक हुकले : गौतम गंभीर 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

2 एप्रिल 2011 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखील भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला होता. या अंतिम सामन्यात सलामीवीर गौतम गंभीरनं 97 धावांची रोमांचक खेळी केली होती. गंभीरचे शतक अवघ्या 3 धावांनी हुकले होते. मात्र, माझं हे शकत धोनीमुळे झाले नाही असा आरोप गौतम गंभीरनं केला आहे. एका मुलाखतीत गौतम गंभीरने हा खळबळजनक आरोप केला आहे.

गौतम गंभीर म्हणाला, फायनलमध्ये 97 धावांवर असताना धोनीनं मला सल्ला दिला आणि मी शतकी खेळी करण्यात अपयशी ठरलो. कारण 97 धावांवर असताना मी वैयक्तिक धावांचा विचारही केला नव्हता. त्यावेळी श्रीलंकेनं दिलेल्या लक्ष्याकडे माझं लक्ष होतं. त्यावेळी धोनी माझ्यासोबत मैदानात खेळत होता. धोनी म्हणाला, ‘तुझं शतक पूर्ण होण्यासाठी फक्त तीन धावा आहेत. तू तीन धावा काढून शतक पूर्ण कर’. त्यावेळी धोनीने मला हा सल्ला दिला नसता तर मी तीन धावा काढल्या असत्या. त्यानं मला आठवण करून दिली आणि मी अधिक सावध झालो. आणि पुढच्या चेंडूवर एक चुकीचा फटका मारून मी बाद झालो, असं गंभीरनं सांगितलं.

दरम्यान, त्या सामन्याचा सामनावीर महेंद्रसिंग धोनी, तर स्पर्धेचा मलिकावीर युवराज सिंग याला घोषित करण्यात आले.

 

Related posts: