|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » दिल्लीवासियांना मिळणार सिवर कनेक्शन मोफत : केजरीवाल यांची घोषणा

दिल्लीवासियांना मिळणार सिवर कनेक्शन मोफत : केजरीवाल यांची घोषणा 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :    
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी एक मोठ्या योजनेची घोषणा केली. दिल्लीतील ज्या लोकांनी अद्याप सीवर कनेक्शन घेतले नाही त्यांना या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.
दिल्लीतील ज्या कुटुंबांकडे सीवर कनेक्शन नाही, ते 31 मार्च 2020 पर्यंत कोणत्याही वेळी सीवर कनेक्शन घेऊ शकतात, तेही पूर्णपणे मोफत. यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. या योजनेला मुख्यमंत्री फ्री सीवर कनेक्शन योजना असे नाव देण्यात आले आहे.
दिल्लीतील हजारो कुटुंबांकडे सीवर कनेक्शन नाही. अशा परिस्थितीत जर या कुटुंबांनी 31 मार्चपर्यंत सीवर कनेक्शन घेतले तर त्यांना विनामूल्य कनेक्शन मिळेल. त्यांना कनेक्शन शुल्क, विकास शुल्क किंवा इतर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. असे केजरीवाल यांनी सांगितले. 

Related posts: