|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » Top News » जेएनयू वाद : संसद मोर्चा दरम्यान पोलीसांनी घेतले शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात

जेएनयू वाद : संसद मोर्चा दरम्यान पोलीसांनी घेतले शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :    
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या फीवाढीचा विरोधात विद्यार्थीनी संसदेवर मोर्चा काढला आहे . मानव संसाधन विकास मंत्रालयाने (एचआरडी) सोमवारी तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे, जे जेएनयूचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी मार्ग सुचवतील. असे मानव संसाधन विकास मंत्रालयाने (एचआरडीने) सांगितले आहे.
त्यानंतर ही विद्यार्थ्यांचा संसदेवरील मोर्चा सुरूच आहे.  त्यांना संसदेजवळ  जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. परवानगी नसतानाही संसद भवनाच्या दिशेने जाण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सतत प्रयत्न केला जात आहे.जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पोलिसांना रोखल्यानंतर त्यांचे मार्ग बदलले आहेत. आता ते वसंत विहार येथून संसदेकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि वसंत विहार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. 
कोणत्याही परिस्थितीत ते संसदेत पोहोचतील असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे, तर पोलिसांनी सर्व मार्गांवर विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली आहे असा दावा पोलिसांनी केला आहे

Related posts: