|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Agriculture » गायीच्या पोटावर साक्षात मातेचे दर्शन

गायीच्या पोटावर साक्षात मातेचे दर्शन 

गाय ही एक प्रसिद्ध आणि अतिशय महत्वाचा पाळीव प्राणी आहे. भारतात गाईला गाय आमची आई म्हणून ओळखली जाते सामान्यतः मुलांना त्यांच्या वर्गात किंवा परीक्षेच्यावेळी गाईवर निबंध लिहिण्यास सांगितले जाते. हिंदू धर्मातील लोक गाईला आपली आई म्हणून संबोधतात.

गाय आपल्याला एक निरोगी पौष्टिक तसेच संपूर्ण अन्न देणारी आहे. लहान मुलांसाठी गाईचे दुध अत्यंत महत्त्वाची बाब आहे तसेच संपूर्ण कुटुंबासाठी गायचे दूध हे उपयुक्त असतेच. वेगवेगळय़ा जातीच्या गायी आपल्याला पाहायला मिळतात. कपिला गाय जर्सी गाय या प्रकारच्या विविध जातीच्या काही आपल्याला माहीतच आहेत. सर्व गाईंचा आकार रंग वेगळा असतो. गाईच्या अंगावर वेगवेगळी चित्रे असतात. पण बेळगाव जिल्हातील देसाई इंगळी गावातील राहुल जाधव यांच्या घरी गायीच्या पोटावर साक्षात मातेचे दर्शन झाले आहे. बाळाला ज्या पद्धतीने ममतेने आई जवळ घेते त्याच पद्धतीचे चित्र गायीच्या पोटावर उमटले आहे. हे चित्र पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत. गायीला गोमातेची उपमा देतात त्याच गायीच्या शरीरावर ममतेची उमटलेले हे चित्र पाहून अनेकजण भारावून जात आहेत. राहुल जाधव यांच्या घरी ही गाय असून माया ममतेचे हे दृश्य चर्चेचा विषय ठरत आहे.

Related posts: