|Thursday, December 12, 2019
You are here: Home » leadingnews » सेनेला पाठिंबा देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही : शरद पवार

सेनेला पाठिंबा देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही : शरद पवार 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

सोनिया गांधी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत आज, सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आज आम्हीं बैठकीमध्ये राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली. सेनेला पाठिंबा देण्याबाबत अजून ठोस निर्णय झालेला नाही. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वैसर्वा शरद पवार यांनी दिली. सोनिया गांधींबरोबरच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

शिवसेनेच्या आघाडीबाबत राजू शेट्टी, समाजवादी पक्षाला विश्वासात घ्यावे लागणार आहे. आघाडीतल्या मित्रपक्षांना आम्ही नाराज करू शकत नाही. त्यामुळे त्यांना बरोबरच घेऊन आम्ही पुढची पावले टाकू असं ते म्हणाले. 

दरम्यान, शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येईल का? असे विचारले असता ते म्हणाले, याबद्दल आम्हीं काय बोलणार, त्यांच त्यानाच माहिती.

 

Related posts: