|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सर्व ग्रामपंचायतींनी स्पर्धेत सातत्य ठेवावे!

सर्व ग्रामपंचायतींनी स्पर्धेत सातत्य ठेवावे! 

सभापती सुनील मोरजकर यांचे आवाहन : ग्रा. पं. कार्ड वाटप कार्यक्रम

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

वेंगुर्ले पंचायत समिती आयोजित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे संरक्षण सर्वेक्षण कार्यक्रम साई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, उपसभापती स्मिता दामले जि. प. सदस्य दादा कुबल, पं. स. सदस्य गौरवी मडवळ तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी उमा पाटील तालुका स्तरावरील सर्व कर्मचारी अधिकारी तसेच तालुक्मयातील 30 पैकी 28 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, आरोग्य सेवक, जलसंरक्षक उपस्थित होते.

सर्व ग्रामपंचायतींना सतत पाच वर्षे पाणी शुद्धीकरण केल्याबद्दल हिरवे कार्ड व  चंदेरी कार्डचे  वाटप करण्यात आले. 28 ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, जलसुरक्षक व अन्य कर्मचारी उपस्थित होते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2018-2019 मध्ये प्रभाग स्तरावर ग्रामपंचायत वार्डनिहाय उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतींना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2018-19 मध्ये वार्ड स्वच्छ स्पर्धा हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. यावेळी सुनील मोरजकर, उपसभापती स्मिता दामल, जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल पंचायत समिती सदस्य  गौरवी मडवळ,  गटविकास अधिकारी उमा पाटील त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर, तालुका समन्वयक पाणी व पुरवठा पाणी स्वच्छता द्रौपदी नाईक, समूह  समन्वयक निर्मला परब आदी उपस्थित होते.

Related posts: