|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ले समुद्रात गोव्यातील दोन ट्रॉलरवर कारवाई

वेंगुर्ले समुद्रात गोव्यातील दोन ट्रॉलरवर कारवाई 

मत्स्य विभागाची कारवाई : ट्रॉलरवरील मासळीचा लिलाव

वार्ताहर / वेंगुर्ले:

वेंगुर्ले समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱया गोवा राज्यातील दोन ट्रॉलर्सना मत्स्य खात्याच्या शीततल या गस्तीनौकेने रंगेहाथ पकडले. वेंगुर्ले तहसीलदार यांचे न्यायालयात या दोन्ही ट्रॉलर्सवर कारवाईसाठी प्रकरण सादर करण्यात आले आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास वेंगुर्ले समुद्रात मासेमारी नियमांचे उल्लंघन करून ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणाऱया गोवा राज्यातील ‘मिनीन जिजस’ व ‘वलानी स्टार’ दोन ट्रॉलर्सवर ‘शीतल’ या शासकीय गस्तीनौकेद्वारे मालवणचे मत्स्य सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले मत्स्य खात्याचे परवाना अधिकारी तथा अंमलबजवणी अधिकारी चिन्मय जोशी, सागर सुरक्षा रक्षक राजेश कुबल, प्रणित मुणगेकर व गस्तीनौकेवरील खलाश्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत ‘मिनीन जिजस’ या ट्रॉलर्सवर सापडलेल्या मासाळीच लिलाव आठ हजार रूपयांचा झाला. तर ‘वलानी स्टार’ या ट्रॉलर्सवरील सापडलेल्या मासळीचा तीस हजार रूपये एवढा झाला.

त्यानुसार आज सोमवारी वेंगुर्ल्याचे मत्स्य अंमलबजावणी अधिकारी चिन्मय जोशी यांनी महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 चे कलम 7 अन्वये बेकायदेशीर मासेमारी केल्याप्रकरणी वेंगुर्ले तहसीलदार यांचे न्यायालयाकडे कारवाईसाठी प्रकरण सादर करण्यात आले आहे.

Related posts: