|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » बँकेतील रकमेवर 5 लाखांचे विमा कवच?

बँकेतील रकमेवर 5 लाखांचे विमा कवच? 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बँकेत जमा असलेल्या खातेदारांच्या रकमेवर 1 लाखाचे असलेले विमा कवच वाढवून ते 5 लाखापर्यंत करण्याचा विचार अर्थ मंत्रालयाकडून सुरू आहे. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणात खातेदारांची गुंतवणूक असल्यास हे कवच 25 लाख करण्यावरही प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत ऑक्टोबर महिन्यात विचार सुरू असल्याचे सांगितले होते.

हा निर्णय अंमलात आल्यास 1993 नंतर पहिल्यांदाच विम्याच्या रकमेत वाढ होणार आहे. 1992 मध्ये बँक ऑफ कराड दिवाळखोर घोषित करण्यात आली होती. त्यानंतर 1 जानेवारी 1993 ला बँकेतील जमा रकमेवर 30 हजाराचे असलेले विमा कवच वाढवून ते 1 लाख रुपये करण्यात आले होते. या विमा कवचामुळे बँक बुडाल्यास किंवा दिवाळखोर घोषित झाल्यास खातेदारांना जमा रकमेपैकी जास्तीतजास्त 1 लाखापर्यंतची रक्कम परत मिळू शकते.

रिझर्व्ह बँकेच्या सब्सिडियरी डिपॉजिट इन्श्यूरन्स अँड पेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशनने (डीआयसीजीसी) बँक बुडाल्यास खातेदारांची काही रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी एक विशेष रिझर्व्ह फंडाची तरतूद केली आहे. बँकेतील गुंतवणूक सुरक्षित मानण्यात येत असल्याने खातेदार त्यांच्या आयुष्याची जमापुंजी बँकेतच ठेवतात. अशा परिस्थितीत बँक बुडाल्यास त्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे खातेदारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी ही मागणी होत आहे.

ओडिशातील भुवनेश्वरमध्ये 13 डिसेंबरला रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत यावर विचार होण्याची शक्मयता आहे. तसेच खातेदारांनी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली असल्यास 25 लाखांपर्यंत विमा कवच देण्यासाठीही योजना आणण्याचा विचार असल्याचे एका वरि÷ अधिकाऱयाने सांगितले. त्याचप्रमाणे एखादा खातेदार विम्यासाठी अतिरिक्त प्रिमियम देण्यास तयार असल्यास त्यावरही विमा रक्कम वाढवण्याच्या प्रस्तावावरही विचार होणार आहे.

Related posts: