|Thursday, December 5, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » नरेंद्र मोदी सरकारवर बरसले मनमोहन सिंग

नरेंद्र मोदी सरकारवर बरसले मनमोहन सिंग 

नवी दिल्ली

 माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेबद्दल सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. विकासाचा दर मागील 15 वर्षांच्या नीचांकी स्तरावर तर बेरोजगारीचे प्रमाण 45 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. देशांतर्गत मागणी 4 दशकांच्या नीचांकी स्तरावर आली आहे, तर बुडित कर्जांचा भार प्रचंड वाढला असल्याने अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचा दावा मनमोहन यांनी लेखाद्वारे केला आहे.

देशातील सर्व संस्था तसेच सरकारबद्दलचा लोकांचा विश्वास खालावला आहे. मंद अर्थगतीसाठी हे प्रमुख कारण आहे. देशाची अर्थव्यवस्था तेथील सामाजिक स्थिती दर्शवत असते. देशाचे लोक तेथील संस्थांवर किती विश्वास ठेवतात हे अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हा संबंध जितका बळकट होईल, अर्थव्यवस्थेचा पाया तितकाच मजबूत होणार असल्याचे मनमोहन यांनी म्हटले आहे.

देशातील अनेक दिग्गज उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भीतीयुक्त वातावरणामुळे भारतीय बँका कर्ज प्रदान करण्यास टाळाटाळ करत आहेत. तंत्रज्ञान विषयक स्टार्टअप्स सर्व्हिलान्समुळे घाबरत असून सरकारी यंत्रणांच्या अधिकाऱयांना सत्य मांडता येणे अशक्य ठरल्याचे मनमोहन म्हणाले.

Related posts: