लडाखसाठी विशेष डिझेल उपलब्ध होणार

लडाखसाठी ‘विंटर ग्रेड डिझेल’ सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे. लडाखमध्ये हिवाळय़ात तापमान उणे 25 पासून उणे 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. या अत्यंत कमी तापमानात डिझेल द्रव स्वरुपात राहू शकत नाही. ही समस्या पाहता इंडियन ऑईलने विंटर ग्रेड डिझेल विकसित केले आहे.