|Thursday, December 5, 2019
You are here: Home » क्रिडा » अफगाणचा विंडीजवर मालिका विजय

अफगाणचा विंडीजवर मालिका विजय 

वृत्तसंस्था/ लखनौ

अफगाण क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विंडीजचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. रविवारी येथे झालेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात अफगाणने विंडीजवर 29 धावांनी विजय मिळविला.

या शेवटच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणने 20 षटकांत 8 बाद 156 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकांत 7 बाद 127 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना मालिका गमवावी लागली.

अफगाणच्या डावात सलामीचा फलंदाज गुरबाजने 52 चेंडूत 79 धावांची खेळी केली. अस्गर अफगाणने 20 चेंडूत 24, एन. झेद्रानने 14 चेंडूत 14 आणि मोहम्मद नबीने 7 चेंडूत 15 धावा जमविल्या. गुरबाजने आपल्या 79 धावांच्या खेळीत 5 षटकार आणि 6 चौकार ठोकले. विंडीजतर्फे कॉट्रेल, विलीयम्स, के. पॉल यांनी प्रत्येकी 2 तर पोलार्डने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शाय हॉपने 46 चेंडूत 52, सिमॉन्सने 7, लेविस 24, हेटमेयरने 11 धावा जमविल्या.

संक्षिप्त धावफलक

अफगाण- 20 षटकांत 8 बाद 156, विंडीज- 20 षटकांत 7 बाद 127.

Related posts: