|Friday, December 6, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्षअखेरीस नादाल एटीपी मानांकनात अव्वल

वर्षअखेरीस नादाल एटीपी मानांकनात अव्वल 

वृत्तसंस्था/ पॅरीस

स्पेनचा टेनिसपटू राफेल नादालने 2019 च्या टेनिस हंगामाअखेर एटीपीच्या मानांकनात पहिले स्थान कायम राखले आहे. एटीपीच्या मानांकनात वर्षअखेरीस नादालने पाचव्यांदा अग्रस्थान राखले आहे. सोमवारी एटीपी ताजी मानांकन यादी जाहीर करण्यात आली.

2019 च्या टेनिस हंगामात नादाल आणि सर्बियाचा जोकोव्हिक यांनी आपले वर्चस्व राखले होते. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी दोन प्रमुख स्पर्धा जिंकल्या. जोकोव्हिकने ऑस्ट्रेलियन आणि विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम तर नादालने प्रेंच आणि अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. स्वीसचा 38 वर्षीय अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडरर या ताज्या मानांकन यादीत तिसऱया स्थानावर राहिला.

एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत स्पेनचा राफेल नादाल 9985 गुणांसह पहिल्या, सर्बियाचा जोकोव्हिक 9145 गुणांसह दुसऱया, स्वीसचा फेडरर 6590 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रीयाचा थिएम 5825 गुणांसह चौथ्या, रशियाचा मेदव्हेदेव 5705 गुणांसह पाचव्या, ग्रीसचा सिटसिपेस 5300 गुणांसह सहाव्या, जर्मनीचा ऍलेक्सझांडेर व्हेरेव्ह 3345 गुणांसह सातव्या, इटलीचा बेरेटेनी 2870 गुणांसह आठव्या, स्पेनचा बॉटिस्टा 2540 गुणांसह नवव्या आणि फ्रान्सचा मोनफिल्स 2530 गुणांसह 10 व्या स्थानावर आहे.

Related posts: