|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » कर्णधार पेनकडून निवृत्तीचे संकेत

कर्णधार पेनकडून निवृत्तीचे संकेत 

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार टीम पेनीने निवृत्तीचे संकेत दिले आहे. पाक आणि न्यूझीलंडविरूद्ध होणाऱया कसोटी मालिका या आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील शेवटच्या असतील, असे पेनीने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

2018च्या मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेत चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी ठरल्याने माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथवर एक वर्षांची बंदी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातली आणि यष्टीरक्षक व फलंदाज टीम पेनीकडे कर्णधारपद सोपविण्यात आले. पेनीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका बरोबरीत राखली. माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याच्यानंतर अशी कामगिरी करणारा पेनी हा दुसरा कर्णधार आहे. पुढील महिन्यात पेनी 35 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी येत्या गुरूवारपासून ब्रिस्बेन येथे खेळविली जाईल. आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रिकेट मानांकनात ऑस्ट्रेलिया सध्या पाचव्या स्थानावर असून भारत पहिल्या स्थानावर आहे.

Related posts: