|Thursday, December 12, 2019
You are here: Home » क्रिडा » ग्रीसचा सिटसिपेस अजिंक्य

ग्रीसचा सिटसिपेस अजिंक्य 

वृत्तसंस्था/ लंडन

2019 च्या टेनिस हंगामातील येथे रविवारी झालेल्या एटीपी टूरवरील पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ग्रीसच्या 21 वर्षीय स्टिफॅनोस सिटसिपेसने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना ऑस्ट्रीयाच्या थिएमचा पराभव केला.

गुरूवारी झालेल्या अंतिम सामन्यात सिटसिपेसने थिएमचा 6-7 (6-8), 6-2, 7-6 (7-4) असा पराभव केला. 2001 साली ऑस्ट्रेलियाचा लेटॉन हेवीट ही स्पर्धा जिंकणारा सर्वात तरूण टेनिसपटू होता. आता सिटसिपेस ही स्पर्धा जिंकणारा पहिला टेनिसपटू आहे. सिटसिपेसने या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत विजेतेपद मिळविले आहे. एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सिटसिपेस सहाव्या स्थानावर आहे.

 

Related posts: