सर्फराज अहमदने राष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष द्यावे : इम्रान खान

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाक क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक सर्फराज अहमद पुन्हा राष्ट्रीय संघात येण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तथापि राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी त्याने प्रयत्न करावे असे मत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे.
टी-20 प्रकारात कोणत्याही क्रिकेटपटूंच्या कामगिरी आणि फॉर्मबद्दल निश्चित खात्री देता येत नाही पण कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूच्या कामगिरीचा निश्चितच दर्जा ठरविता येतो, असे इम्रान खानने पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. पाक संघात प्रवेश मिळविण्यासाठी सर्फराज अहमदने राष्ट्रीय स्पर्धेवर अधिक भर द्यावा, असा सल्ला पाकच्या पंतप्रधानानी सर्फराजला दिला आहे.
Related posts:
Posted in: क्रिडा