|Friday, January 24, 2020
You are here: Home » क्रिडा » पोर्तुगालच्या रोनाल्डोचा 99 वा गोल

पोर्तुगालच्या रोनाल्डोचा 99 वा गोल 

वृत्तसंस्था/ लक्झमबर्ग

रविवारी येथे झालेल्या युरो चषक पात्र फेरीच्या सामन्यात पोर्तुगालने लक्झमबर्गचा 2-0 असा पराभव करत 2020 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्चित केले. या सामन्यात पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्टीयानो रोनाल्डोने आपला 99 वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदविला.

या सामन्यात 39 व्या मिनिटाला पोर्तुगालचे खाते ब्रुनो फर्नांडिसने उघडले. सामना संपण्यास 4 मिनिटे बाकी असताना रोनाल्डोने पोर्तुगालचा दुसरा गोल नोंदवून लक्झमबर्गचे आव्हान संपुष्टात आणले. रोनाल्डोचा हा 99 वा आंतराष्ट्रीय गोल आहे. या विजयामुळे पोर्तुगालने 2020 साली होणाऱया युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. पोर्तुगालने पात्र फेरीच्या स्पर्धेत ब गटात 17 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. सर्बिया आणि युक्रेन यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. पोर्तुगालने या गटात सर्बियावर 3 गुणांची आघाडी घेतली.

Related posts: