|Sunday, December 8, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू स्मिथवर बंदी

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू स्मिथवर बंदी 

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियातील महिलाच्या बिग बॅश लीग स्पर्धेत आपल्याच संघातील निवड करण्यासाठी आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे उघड झाल्याने होबार्ट हुरीकेन्स संघाची क्रिकेटपटू इमेली स्मिथवर एक वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केला आहे.

या निर्णयामुळे 24 वर्षीय स्मिथला यावर्षीच्या महिलांच्या राष्ट्रीय क्रिकेट लीग स्पर्धेत तसेच बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. सिडनी थंडर्स विरूद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी स्मिथच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये काही रक्कम जमा केल्याचे आढळून आले. वादळी वातावरणामुळे हा सामना रद्द करावा लागला होता.

 

Related posts: