|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » क्रिडा » हॉकी प्रो लीगमधील भारताचे सामने भुवनेश्वरमध्ये

हॉकी प्रो लीगमधील भारताचे सामने भुवनेश्वरमध्ये 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2020 मध्ये होणाऱया हॉकी प्रो लीगमधील भारताचे घरचे सामने भुवनेश्वरमध्ये आयोजित केले जाणार असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने सोमवारी जाहीर केले.

हॉकी प्रो लीगची दुसरी आवृत्ती 11 जानेवारी ते 28 जून या कालावधीत खेळविली जाणार असल्याचे एफआयएचने सांगितले. भुवनेश्वर हे भारतातील हॉकीचे प्रमुख केंद्र बनले असून अलीकडे अनेक मोठय़ा हॉकी स्पर्धा तेथे भरविण्यात आल्या आहेत. ऑलिम्पिक पात्रता फेरीचे सामने अलीकडेच या ठिकाणी खेळविण्यात आले होते. भुवनेश्वरमध्ये भारताचा पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध 18 जानेवारीस होणार आहे. प्रो लीगच्या येत्या मोसमात एकूण 144 सामने होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे घरचे सामने पर्थ व सिडनीमध्ये तर इंग्लंडचे सामने लंडनमध्ये आपले सामने खेळेल. या लीगमधील उद्घाटनाचा सामना नेदरलँड्स व चीन यांच्यात 11 जानेवारी 2020 रोजी चँगझोयूमधील वुजिन हॉकी स्टेडियममध्ये खेळविला जाणार आहे.

या लीगमधील संघांच्या सामन्यांची केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत.

अर्जेन्टिना : ब्युनॉन एअर्स, सॅन मिग्वेल डी तुकुमन, ऑस्ट्रेलिया : पर्थ व सिडनी, बेल्जियम : अँटवर्प, चीन : चँगझोयू, जर्मनी : मॉन्चेनग्लाडबाच, हॅम्बुर्ग, बर्लिन, ग्रेट ब्रिटन : लंडन, भारत : भुवनेश्वर, नेदरलँड्स : युट्रेच, रॉटरडॅम, हर्टोगेनबॉश, ऍम्स्टरडॅम, न्यूझीलंड : ख्राईस्टचर्च, ऑकलंड, स्पेन : व्हॅलेन्सिया, अमेरिका : उत्तर कॅरोलिना.

Related posts: