|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दोष दायित्व रस्ते ठेकेदारांकडून करुन घेणार

दोष दायित्व रस्ते ठेकेदारांकडून करुन घेणार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांना ठेकेदारच जबाबदार असल्याचा आरोप कोल्हापूर शहर व नागरी कृती समितीने केला.यासाठी महापालिकेच्या अधिकाऱयांना धारेवर संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दोष दायित्व रस्ते संबंधित ठेकेदारांकडून करुन घेण्याचे आश्वासन कृती समितीला दिले.

 

शहरातील रस्त्या संदर्भात शहर व जिल्हा नागरी कृती समिती आणि महापालिका अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन ताराराणी सभागृह येथे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत होते. या बैठकीला उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, रमेश मस्कर, रावसाहेब चव्हाण, आर.के.जाधव उपस्थित होते.

या बैठकीत उपशहर अभियंत्यांनी शहरातील एकूण खराब रस्ते किती,ठेकेदारांची नावे,रस्त्याची मुदत, रस्ते खराब झाल्याची कारणे,रस्त्यावरील फलक,याबाबतची माहिती दिली. यावेळी समितीकडून प्रत्येक विभागीय कार्यालयातील रस्त्यांबाबत संबधीत अधिकाऱयांना विचारणा करण्यात आली. यावेळी विभागीय कार्यालय दोन चे उपशहर अभियंता राबसाहेब चव्हाण यांनी विभागातील बहुतांश रस्ते सुस्थीतीत असल्याचे सांगितल्यावर कृती समिती पदाधिकारी त्यांच्यावर भडकले. या विभागात 20 प्रभाग  असून यातील एकही रस्ता खराब नाही का ? अशी विचारणा रमेश मोरे यांनी  चव्हाण यांना केली. या कार्यालयांतर्गत येणारे खराब रस्ते दाखवण्याचे आव्हानही दिले.  माजी नगरसेवक अनिल कदम यांनी राजारामपुरी परिसरातील खराब रस्त्यांबाबत अभिंयंता सरनोबत यांच्याकडे विचारणा केली. यावेळी कृती समिती पदाधिकायांनी शहरातील प्रत्येक परिसरातील खराब रस्ते आणि त्यामागची कारणे याबात अधिकायांना विचारणा केली.

बैठकीदरम्यान शहरातील खराब रस्त्यांबाबत संबंधीत ठेकेदारांना नोटीस बजावून दोष दायीत्व झालेले रस्ते ठेकेदाराकडून पुन्हा दुरूस्त करून घेऊ असे आश्वासन नेत्रदीप सरनोबत यांनी समितीला दिले. तसेच ज्या ठेकेदाराकडून मुदतीत  रस्ते खराब झाले आहेत त्या ठेकेदाराचे नाव ब्लॅक लिस्टला टाकले जाईल असेही सांगण्यात आले.

या बैठकीला आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, अशोक पोवार,गणी आजरेकर, लालासो गायकवाड, ऍड पंडीतराव सडोलीकर, दिलीप पवार, पांडुरंग अडसूळे, किशोर घाटगे,राजाराम सुतार,विजय करजगार, विजय पोळ, रणजीत आयरेकर उपस्थित होते.

Related posts: