|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » क्रिडा » शिरढोण येथील शेतकऱयाची कर्जाला कंटाळून आत्महत्त्या

शिरढोण येथील शेतकऱयाची कर्जाला कंटाळून आत्महत्त्या 

वार्ताहर/ शिरढोण

येथील तुकाराम रामू माने (वय 65, रा. मगदूम गल्ली)  या शेतकऱयाने कर्जाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्त्या केली. याबाबतची वर्दी विजय दादासो मगदूम यांनी कुरूंदवाड पोलीस ठाण्यात दिली आहे. शेतकरी माने यांनी गावातील सोसायटीमधून कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर कर्ज घेतले आहे.

याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तुकाराम माने यांनी सोसायटीतून कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेतले होते. दरम्यान, महापूर व अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले होते. अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने तुकाराम माने आर्थिक विवंचनेत होते. तीन महिन्यांपासून कामधंदा नसल्यामुळे तणावात होते, अशी घटनास्थळी चर्चा होती. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले आहे. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या पश्चात पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

आज रास्ता रोको

शेतकरी तुकाराम माने यांच्या आत्महत्त्येमुळे शासन व्यवस्थेविरोधात शिरढोण येथील ग्रामस्थांनी मंगळवार 19 रोजी रास्ता रोको करण्यात येणार आहे. माने यांच्या कुटुंबाला तसेच शिरोळ तालुक्यातील शेतकऱयांना शासनाकडून त्वरित मदत मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे स्वाभिमानीचे विश्वास बालिघाटे यांनी सांगितले.

 

Related posts: