|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » कोल्हापूरच्या महापौरपदी अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर

कोल्हापूरच्या महापौरपदी अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर 

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूरच्या  महापौरपदी अ‍ॅड.  सुरमंजिरी लाटकर यांची तर उपमहापौर पदी काँग्रेसचे संजय मोहिते यांची निवड झाली. दोन्ही उमेदवारांनी विरोधी भाग्यश्री शेटके व कमलाकर भोपळे यांचा 43 विरुद्ध 32मतांनी पराभव केला.

माधवी गवंडी आणि भूपाल शेटे यांनी महापौर, उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही पदांसाठी मंगळवारी महापालिकेच्या राजश्री छत्रपती शाहू सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली.

प्रथम नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नामनिर्देशन पत्राचे वाचन केले. यानंतर मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला, पहिल्यांदा महापौर पदासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीच्या अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर यांना 43 तर भाजपच्या भाग्यश्री शेटके यांना 32 मते मिळाली. यानंतर उपमहापौर पदासाठी मतदान झाले. यामध्येही काँग्रेसचे संजय मोहिते यांना 43 तर ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे यांना 32 मते मिळाली.

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महापौरपदी अ‍ॅड.  सुरमंजिरी लाटकर यांना तर उपमहापौर पदी  संजय मोहिते यांना विजयी घोषित केले.

Related posts: