|Saturday, December 7, 2019
You are here: Home » leadingnews » सावरकरांना ‘भारतरत्न’साठी शिफारशीची गरज नाही : केंद्र सरकार

सावरकरांना ‘भारतरत्न’साठी शिफारशीची गरज नाही : केंद्र सरकार 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची गेल्या काही वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही. योग्यवेळीच भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला जातो, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने आज लोकसभेत सावरकरांना पुरस्कार देण्याबाबतच्या प्रश्नावर हे उत्तर दिलं. भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी सावरकरांना भारतरत्न कधी देणार? असा प्रश्न उपस्थित केला होता.

भारतरत्न पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दरवषी हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र विधनसभा निवडणुकीत सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा भाजपने केली होती. शिवसेनेनेही अनेकदा सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केलेली आहे.

 

Related posts: