|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मंगलोर, कर्नाटकच्या ट्रॉलरना चार लाखाचा दंड

मंगलोर, कर्नाटकच्या ट्रॉलरना चार लाखाचा दंड 

वेंगुर्ल्यात मत्स्य खात्याने केली होती कारवाई

वार्ताहर / वेंगुर्ले:

वेंगुर्ले बंदरासमोरील 12 ते 16 वाव खोल पाण्यात बेकायदेशीर मासेमारी करणाऱया मंगलोर व कर्नाटक येथील दोन ट्रॉलरना महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत मत्स्य खात्याकडून केलेल्या कारवाईत वेंगुर्ले तहसीलदार यांच्या न्यायालयाने चार लाखाचा दंड केला.

वेंगुर्ले बंदरासमोरील सुमारे 12 ते 16 वाव खोल समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱया मेंगलोर येथील जोसेफ डिसोजा यांच्या ‘सिविंड’ तर कर्नाटकातील मलपी येथील लोकनाथ कोडाऊर यांच्या ‘मानिस्कांडा’ या मासेमारी ट्रॉलरांला वेंगुर्ले मत्स्य खात्याचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांच्या पथकाने गस्तीनौकेद्वारे पकडले होते. त्यांच्यावर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 च्या कलम 7 अंतर्गत वेंगुर्ले तहसीलदार यांच्या न्यायालयात कारवाईसाठी प्रकरण सादर करण्यात आली होते. त्यानुसार ‘सिविंड’ या ट्रॉलरला 1 लाख, 40 हजार रूपयांचा तर मानिस्कांडा या ट्रॉलरला 2 लाख 60 हजार रूपये असा एकूण 4 लाख रूपयांची दंडात्मक कारवाई वेंगुर्ले तहसीलदार यांचे न्यायालयाने केली आहे.

Related posts: