|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग » ऍमेझॉनला नफ्यानंतरही अमेरिकेत कर सवलत

ऍमेझॉनला नफ्यानंतरही अमेरिकेत कर सवलत 

आर्थिक नियमांचा फायदा : अहवालातून स्पष्ट

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांपैकी जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ऍमेझॉनला मोठा नफा होऊन देखील कर लादण्यात आली नाही. ऍमेझॉनने 11.2 अब्ज डॉलर म्हणजेच 78 हजार 400 कोटी एवढय़ा प्रचंड नफ्यानंतरही कुठल्याही प्रकारचा कर भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेत अब्जावधी डॉलरच्या नफ्यानंतरही कंपन्यांना कर द्यावा लागत नाही. अमेरिकेमधील याच आर्थिक नियमांचा अ‍Ÿमेझॉनला फायदा मिळाला आहे. अ‍Ÿमेझॉनला सलग दुसऱया वषी सुमारे 79 हजार कोटींच्या निव्वळ नफ्यानंतरही कर स्वरुपात कोणतीही रक्कम द्यावी लागली नाही, असे इन्स्टिटय़ूट ऑन टॅक्सेशन अँड इकॉनॉमिक पॉलिसीच्या अहवालानुसार समोर आले आहे.

कट्स अँड जॉब्स या नव्या कायद्यानुसार अ‍Ÿमेझॉनवरील टॅक्सचा दर घटून 21 टक्के झाला आहे. हा कर गतवषी 35 टक्के होता.

 

 मात्र कॉर्पोरेट फायलिंगनुसार टॅक्स ब्रेक्समुळे कंपनीला 78 हजार 400 रुपयांच्या प्रचंड नफ्यानंतरही सरकारला कोणताही कर द्यावा लागला नाही.

ऍमेझॉनचा 2017-2018 मध्येही वाचला कर…

टीसीजेएअंतर्गत मिळणारे नवे ब्रेक्स तसेच लूप होल्सचा फायदा ऍ‍मेझॉनने उचलला आहे. 2017 मध्ये कंपनीला 5.6 अब्ज डॉलर (39 हजार 200 कोटी रुपये) एवढा नफा झाला होता. तसेच 2018 मध्ये याचप्रकारचा नफा झाला होता. मात्र, दोन्ही वर्षीही कंपनीने कोणताही कर दिला नव्हता.

Related posts: