|Thursday, December 5, 2019
You are here: Home » उद्योग » आयडिया पेमेंट्स बँक अखेर होणार बंद

आयडिया पेमेंट्स बँक अखेर होणार बंद 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आदित्या बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक बंद होणार असून, बँकेला   रिझर्व्ह बँकेकडून परवानगी देण्यात आली आहे. बँकेने  जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आपला कारभार संपवण्याची घोषणा केली होती. हा निर्णय काही आकस्मिक घटनांमुळे घेत असल्याचे बँकेकडून सांगितले होते.

आयडिया सेल्युलरने एप्रिल 2016 मध्ये आयडिया मोबाईल कॉमर्स सर्व्हिसेस ही कंपनी पेमेंट बँकेत विलीन केल्यानंतर आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक असा प्रवास सुरू झाला होता.

बँकेने आपल्या ग्राहकांना 20 जुलै 2019 रोजी बॅलन्स लवकरात लवकर ट्रान्सफर करण्याच्या सुचना केल्या होत्या. आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक एप्रिल 2016 मध्ये सुरू झाली होती. आदित्य बिर्ला नुवो आणि आयडिया सेल्युलर यांचा हा संयुक्त उपक्रम होता. यामध्ये आदित्य बिर्ला नुवोची 51 टक्के भागीदारी आहे.

Related posts: