|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » आरआयएलचे बाजार भांडवल पोहोचले 9.5 लाख कोटींवर

आरआयएलचे बाजार भांडवल पोहोचले 9.5 लाख कोटींवर 

वृत्तसंस्था/ मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) बाजार भांडवल 9.5 लाख कोटींवर पोहोचले आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 9 लाख कोटी होता. हा टप्पा पूर्ण करणारी आरआयएल पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. दोन वर्षात आरआयएल 200 अब्ज डॉलरचा आकडा पार करेल, असा विश्वास बँक ऑफ अमेरिकेच्या एका अधिकाऱयाने व्यक्त केला आहे. 

रिलायन्सच्या समभागात मंगळवारी 3.3 टक्क्यांच्या तेजीमुळे समभाग 1506.75 अंकांवर पोहोचला असून, हा नवा विक्रम नोंद झाला आहे. गेल्या महिन्या कंपनीने घोषणा केली होती की, कंपनी एक नवीन साहाय्यक कंपनी सुरू करेल, ज्याद्वारे डिजीटल इन्शिएटिव्ह आणि ऍपचा व्यवसाय होईल. यात 1.08 लाख कोटी गुंतवण्याची योजना असून, भारतात सर्वाधिक डिजीटल सेवा देणारी कंपनी ठरेल, असेही आरआयएलने सांगितले होते.

Related posts: