|Monday, December 16, 2019
You are here: Home » उद्योग » दूरसंचार कंपन्यांच्या परिणामांमुळे बाजार तेजीत

दूरसंचार कंपन्यांच्या परिणामांमुळे बाजार तेजीत 

सेन्सेक्स 185.51 अंकांनी तर निफ्टीत 55.60 अंकांची वाढ

वृत्तसंस्था/ मुंबई

यूरोपीय बाजारातील सकारात्मक संकेत आणि स्थानिक क्षेत्रातील देशाच्या प्रमुख दूरसंचार कंपन्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडून डिसेंबरपासून शुल्क वाढविण्याची घोषणा केल्यामुळे मंगळवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 185.51 अंकांनी वधारून 40469.70 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 55.60 अंकांनी वधारत 11940.10 अंकांवर बंद झाला. दरम्यान, मध्यम कंपन्यांमध्ये विक्री पाहायला मिळाली तर छोटय़ा कंपन्यांत खरेदीचा कल होता.

मुंबई शेअर बाजाराचा मिडपॅप 0.05 टक्के घसरत 14830.49 अंकांवर राहिला. तर स्मॉलकॅप 0.31 टक्क्यांनी वधारत 13404.51 अंकांवर पोहोचला. मुंबई शेअर बाजारात वधारलेल्या प्रमुख समुहात दूरसंचार 8.52 टक्के, ऊर्जा 2.38 टक्के, शक्ती 0.92 टक्के, तंत्रज्ञान 0.88 टक्के, बँकिंग 0.54 टक्के, यूटिलिटी 0.55 टक्के यांचा समावेश आहे. धातू 0.94 टक्के, वाहन 0.74 टक्के, एफएमसीजी 0.58 टक्के यांचा घसरणीमध्ये समावेश आहे. मुंबई शेअर बाजारातील सुमारे 2732 कंपन्यांमध्ये व्यापार झाला, यात 1158 कंपन्या वधारल्या आणि 1385 कंपन्या घसरल्या. तर 189 कंपन्यांत कोणताच बदल पाहायला मिळाला नाही.

शेअर बाजारात सोमवारी दबाव पाहायला मिळाला होता. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 73 अंकांनी घसरत 40284 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 11 अंकांनी घसरून 11884 अंकांवर बंद झाला होता. 

जागतिक स्तरावर अमेरिकी बाजारात समिश्र पद्धतीत सुरू झाले. यूरोपीय बाजारात जवळपास तेजी राहिली. तर आशियाई बाजार समान राहिले. ब्रिटनचा एफटीएसई 1.22 टक्के, जर्मनीचा डॅक्स 1.16 टक्के, हाँगकाँगचा हँगसँग 1.55 टक्के आणि चीन चा शंघाई कंपोजिट 0.85 टक्क्यांनी वधारले तर जपानचा निक्की 0.53 टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.34 टक्क्यांनी घसरणीच्या स्तरावर राहिला.

Related posts: