|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » देशात प्रतिदिन 14 कोटी रुपयांच्या सामग्रीची चोरी

देशात प्रतिदिन 14 कोटी रुपयांच्या सामग्रीची चोरी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जानेवारी ते डिसेंबर 2017 या कालावधीत देशात सुमारे 5,002 कोटी रुपयांच्या सामग्री चोरीस गेली आहे. या आकडेवारीनुसार प्रतिदिन सरासरी 14 कोटी रुपयांची सामग्री चोरीस गेली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार चोरीस गेलेली सामग्री परत मिळण्याचा आकडा अत्यंत निराशाजनक आहे. केवळ 26 टक्के प्रकरणांमध्येच चोरीस गेलेली सामग्री परत मिळू शकली आहे.

चोरी झालेले मोबाईल किंवा लॅपटॉप यासारख्या गॅझेट्सच्या रिकव्हरीचा आकडा केवळ 18 इतका टक्के आहे. तर गाय-म्हैस यासारख्या पशूंच्या चोरींनंतरची रिकव्हरी याच्या तुलनेत दुप्पट आहे. 2017 मध्ये सामग्रीच्या चोरीचे 7.39 लाखांहून अधिक गुन्हे नोंद झाले. या कालावधीत चोरीस गेलेल्या सामग्रीचे मूल्य सुमारे 5002 कोटी रुपये मानले गेले होते. यातही सर्वाधिक मूल्य वाहनांचे असून दुसऱया क्रमांकावर दागिन्यांना स्थान मिळाले आहे.

Related posts: