|Monday, December 16, 2019
You are here: Home » क्रिडा » यू-19 संघाच्या कर्णधारपदी प्रियम गर्ग

यू-19 संघाच्या कर्णधारपदी प्रियम गर्ग 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मुंबईचा डावखुरा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याची 19 वर्षाखालील वयोगटाच्या भारतीय वनडे संघात निवड करण्यात आली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱया पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.

प्रियम गर्ग या संघाचे नेतृत्व करणार असून पुढील वर्षी होणाऱया यू-19 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची ही तयारी सुरू आहे. या मालिकेत विविध जोडय़ा आजमावून पाहिल्या जाणार आहेत. पाच सामन्यांची ही मालिका लखनौमधील एकना स्टेडियमवर 22, 24, 26, 28 व 30 नोव्हेंबर रोजी खेळविली जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी निवडण्यात आलेला यू-19 संघ : यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, अर्जुन आझाद, प्रियम गर्ग (कर्णधार), शाश्वत रावत, कुमार कुशाग्र, दिव्यांश जोशी, मानव सुतार, रवि बिश्नोई, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, अथर्व अंकोलेकर, विद्याधर पाटील, सीटीएल रक्षण, कृतिक कृष्ण.

Related posts: