|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » डेन्मार्क, स्वित्झर्लंड युरो स्पर्धेसाठी पात्र

डेन्मार्क, स्वित्झर्लंड युरो स्पर्धेसाठी पात्र 

वृत्तसंस्था/ पॅरीस

2020 साली होणाऱया युरो चषक फुटबॉल स्पर्धेत डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड यांनी आपले स्थान निश्चित केले. त्याचप्रमाणे पात्र फेरीच्या स्पर्धेत इटलीने अर्मेनियाचा 9-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.

सोमवारी झालेल्या पात्र फेरीच्या सामन्यात आयर्लंडने डेन्मार्कला 1-1 असे बरोबरीत रोखले. पुढीलवर्षी होणाऱया युरो चषक अंतिम फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी आयर्लंडला सोमवारचा सामना जिंकणे जरूरीचे होते. सोमवारच्या सामन्यात डेन्मार्कतर्फे मॅट डुहेर्टीने हेडरद्वारे तर आयर्लंडतर्फे डेल्सगार्डने 73 व्या मिनिटाला गोल नोंदविले. ड गटात डेन्मार्कने दुसरे स्थान घेतले. स्वित्झर्लंड या गटात पहिले स्थान मिळविले. ड गटातील अन्य एका सामन्यात स्वित्झर्लंडने जिब्राल्टरचा 6-1 अशा गोलफरकाने पराभव केला. स्वित्झर्लंडतर्फे सेड्रीक इटेनने दोन गोल केले. जे गटातून इटलीने युरो चषक 2020 च्या स्पर्धेत आपले स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे. यात्र फेरीच्या सामन्यात इटलीने अर्मेनियाचा 9-1 असा दणदणीत पराभव केला. फ गटात स्पेनने पहिले स्थान मिळविले. पात्र फेरीच्या सामन्यात स्पेनने रूमानियाचा 5-0 असा फडशा पाडला. फ गटात स्वीडन दुसऱया स्थानावर राहिला. स्वीडनने फेरोई आयलंडसचा 3-0 असा पराभव केला.

Related posts: