|Friday, December 13, 2019
You are here: Home » क्रिडा » शहदात हुसेनवर पाच वर्षांची बंदी

शहदात हुसेनवर पाच वर्षांची बंदी 

वृत्तसंस्था/ ढाक्का

बांगलादेशचा माजी वेगवान गोलंदाज शहदात हुसेनने येथे झालेल्या राष्ट्रीय क्रिकेट लीग सामन्यात आपल्याच संघातील एका खेळाडूवर हल्ला केला होता. शहदात हुसेनकडून शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याने बांगलादेश क्रिकेट संघटनेने शहदात हुसेनवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दुसऱया खेळाडूवर हल्ला करण्याचा गुन्हा हुसेनकडून झाल्याचे पंचांनी आपल्या सामना अहवालामध्ये झाल्याची नोंद केली. शहदातने आपल्याच संघातील एका खेळाडूच्या थोबाडात मारली. तसेच त्याला लाथ मारली होती. शहदात हुसेनवर पाच वर्षांची बंदी तसेच त्याला तीन लाख रूपये दंड बांगलादेश क्रिकेट संघटनेने ठोठाविला आहे. शहदात हुसेनने याप्रकरणी आपला गुन्हा कबुल केला आहे.

Related posts: