|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » ख्रिस लिनचा नवा विक्रम

ख्रिस लिनचा नवा विक्रम 

वृत्तसंस्था/ अबुधाबी

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ख्रिस लीनने टी-10 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम नोंदविला आहे. येथे सुरू असलेल्या तिसऱया अबुधाबी टी-10 लीग स्पर्धेत मराठा अरेबियन्स संघाकडून खेळताना ख्रिस लीनने 30 चेंडूत 91 धावांचा नवा विक्रम करताना यापूर्वीच्या ऍलेक्स हॅलेसचा विक्रम मागे टाकला.

काही दिवसापूर्वी आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स संघाने ख्रिस लीनची मुक्तता केली होती. आता तो अबुधाबीतील स्पर्धेतील खेळत आहे. मराठा अरेबियन्स आणि अबुधाबी यांच्यातील या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मराठा अरेबियन्सने 10 षटकांत 2 बाद 138 धावा जमविल्या. ख्रिस लीनने 30 चेंडूत 7 षटकार आणि 9 चौकारांसह 91 धावा झोडपल्या. त्यानंतर अबुधाबी संघाने 10 षटकांत 3 बाद 114 धावा जमविल्याने त्याना सामना 24 धावांनी गमवावा लागला.

Related posts: