|Friday, December 6, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय पदक विजेत्या पॅरा खेळाडूंचा सत्कार

भारतीय पदक विजेत्या पॅरा खेळाडूंचा सत्कार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दुबईत नुकत्याच झालेल्या विश्व पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धेत पदके मिळविणाऱया भारतीय ऍथलीटसचा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांच्या हस्ते सोमवारी येथे रोख रकमेची बक्षिसे देवून गौरव करण्यात आला.

सदर स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कास्य अशी एकूण नऊ पदकांची कमाई केली. तसेच पुढीलवर्षी होणाऱया टोकियो पॅरा ऑलिंपक स्पर्धेसाठी भारताच्या 13 स्पर्धकांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. दुबईतील स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया संदीप चौधरी आणि सुंदर सिंग गुर्जर यांना प्रत्येकी 20 लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आले. रौप्यपदक विजेते सुमीत ऍटील आणि शरदकुमार यांना प्रत्येकी 14 लाख रूपयांचे बक्षीस केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचप्रमाणे पाच कास्यपदक विजेत्यांना प्रत्येकी 8 लाख रूपयांचे बक्षीस देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

Related posts: