|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा परिषदेचे अध्यक्षद पुढील अडीच वर्षासाठी नागरिकांचा मागस प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षीत झाले आहे. आरक्षण सोडतीनंतर राजकिय हालचाली गतीमान झाल्या आहेत. सत्ताधारी भाजप आघाडीकडून गटनेते अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, तर काँग्रेस आघाडीकडून पांडूरंग भांदिगरे, सतिश पाटील, भगवान पाटील, जयवंत शिंपी यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. तथापि राज्यात महाशिवआघाडी आकारास येत आहे, यापार्श्वभूमीवर राजकिय समीकरणे बदलू शकतात. महापालिकेचा फार्म्युला जिल्हा परिषदेमध्ये आल्यास शिवसेनेची भुमिका महत्वाची ठरणार आहे. लहान आघाडय़ांचेही मोल वाढणार आहे. ागोकुळ, जिल्हा बॅकेची निवडणूक चार महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेला महत्व आले आहे.

मागिल अडीच वर्षासाठी अध्यक्षपद सर्वसाधारण होते. शिवसेनेतील दोन गट, जनसुराज्य, आवाडे, स्वाभिमानी, ताराराणी आघाडी, चंदगड विकास आघाडी एक अपक्ष आणि काँग्रेसच्या रेश्मा देसाई, राष्ट्रवादीचे विजय बोरगे यांच्या अप्रत्यक्ष मदतीमुळे जिल्हा परिषेदवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकला. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. शौमिका महाडिक यांना अध्यक्षपदी विराजमान करुन महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना धडा शिकवला होता.

महाशिव आघाडी भाजपची डोकेदुखी ठरणार

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकिय चित्र वेगाने बदलत आहे. याचे परिणाम जिल्हय़ाच्या राजकारणातही उमटू लागले आहेत. मंगळवारी महापौर निडीतही झलक पहावास मिळाली. लोकसभेच्या दोन्ही जाग शिवसेने जिंकल्या. विधनसभा निवडणुकीत भाजप- शिवसनेची पडझड झाली. शिवसेनेला पाच तर भाजपला दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. त्यामुळे जिल्हय़ातील पुढील राजकारणाची दिशा बदलू शकते. सध्या शिवसेना भाजपमध्ये विस्तव आढ जात नाही. जिल्हा परिषदेमध्ये सेनेचे संख्याबळ 10 वर आहे. महाशिवआघाडी झाल्यास सेनेची मदत काँग्रेस आघाडीला होण्याची शक्यता आहे. तथापि मातोश्रीवरुन सक्त आदेश आला तरच हे शक्य आहे. तसे घडल्यास माजी आमदार सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके यांची कोंडी होणार आहे.

शिवसेना- लहान आघाडय़ांचे महत्व वाढले

प्रत्येकी दोन संख्याबळ असलेल्या स्वाभिमानी आणि आवाडे गट जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजपसोबत आहेत. राजू शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेतली तर विधानसभेत आमदार प्रकाश आवाडे भाजपसोबत असल्याने राजू शेट्टी काय करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चंदगड विकास आघाडी सध्यातरी भाजपसोबत राहील असे दिसते. शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्याकडे दोन सदस्य आहेत. गोकुळचे राजकारण लक्षात घेवून त्यांनी महाडिक यांना पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने जनसुराज्यच्या विरोधात ते काँग्रेस आघाडीला साथ देण्याची शक्यता आहे. भाजप, जनसुराज्य, ताराराणी, चंदगड विकास आघाडी अशी 25 तर काँग्रेस आघाडीकडेही 25 हक्काचे सदस्य आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दोन्ही आघाडय़ांना लहान आघाडय़ांचीच मदत घ्यावी लगाणार आहे.

Related posts: