मुदाळ तिट्टा येथील जुगार अड्डय़ावर छापा

26 जण ताब्यात : कोल्हापूर व भुदरगड पोलीसांची धडक कारवाई
गारगोटी / प्रतिनिधी
मुदाळतिट्टा येथे तीनपाणी जुगार अडय़ावर छापा टाकून 26 जुगाऱयांसह 23 मोबाईल, 6 दुचाकी, 42 हजार रूपयांची रोकड पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. कोल्हापूर पोलीस व भुदरगड पोलीस पथकाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.
मुदाळतिट्टा येथील आदमापूर रोडच्याबाजूला एका घरात तिनपाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांना मिळाली होती. करवीरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत अमृतकर व त्यांचे पथक तसेच भुदरगडचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे आणि त्यांचे पथक यांच्या संयुक्त पथकाने आज सकाळपासून सापळा लावला होता. दुपारी 12 च्या सुमारास जुगार अडय़ावर छापा टाकून धडक कारवाई करण्यात आली.
या जुगार अडय़ाचा मालक धनाजी बाबुराव पाटील याची सावकार म्हणून परिसरात चांगलीच दहशत आहे. या सावकारासह 26 जणांना पोलीसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 23 मोबाईल, 6 दुचाकी, 42 हजाराची रोकड, खेळण्याचे पत्ते, प्लॅस्टीक क्वाईन आदी मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीसांनी अनिरूद्ध रघुनाथ सुतार, मनोहर सखाराम पाटील, मारूती बाबू चौगले, मधुकर विठ्ठल टेंबुगडे (सर्व रा. सोनाळी, ता. कागल), दिनकर बाबुराव मगदूम (निढोरी), बाळकृष्ण शंकर बरकाळे (वाघापूर), रमजान अमित लांजेकर (फेजीवडे), आयुब हसन लांजेकर (फेजीवडे, ता. राधानगरी), युवराज गणपती पाटील (आदमापूर), राजाराम शंकर खांडेकर (खिंडीव्हरवडे), प्रविण जयसिंग गायकवाड, रमेश नामदेव कांबळ,s नामदेव शेसबा गायकवाड, विलास वसंत शिंदे, सिताराम महादेव पाटील (बिद्री), दिनकर अंतु पाटील, दिलीप गोविंद इंगळे, मेहबुब मिरासाहेब नदाफ (मुदाळ), अक्षय बाजीराव कांबळे, सदाशिव सुभाष पुजारी (मुरगूड), अमर कुंडलिक कांबळे (उंदरवाडी), सुभाष यशवंत सुतार (कुर), मारूती पांडुरंग कुंभार (बोरवडे), रामचंद्र धुळाप्पा सुतार (कासारवाडा), प्रकाश वसंत गोसावी (बानगे) यांना अटक करण्यात आली आहेत.