|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पाईपलाईन गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर

पाईपलाईन गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर 

बुधवारी रात्री उशिरा काम पूर्ण होण्याची शक्यता

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  साळोखेनगर पाण्याची टाकी व बुद्धीहाळकरनगर येथील शिंगणापूर योजनेवरील 1100 मीमी व्यसाच्या प्रिस्टेस पाईपची गळती काढण्यासाठी क्रॉस कनेक्शन करण्याचे काम महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर सुरु आहे. गळती काढण्याच्या कामामुळे साळोखेनगर पाण्याच्या टाकीवर अवलंबुन असणारा परिसर आणि फुलेवाडीच्या काही भागाला बुधवारी पाणीपुरवठा होवू शकणार नाही. तर गुरुवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

   साळोखेनगर पाण्याची टाकी व बुद्धीहाळकरनगर येथील शिंगणापूर योजनेवरील 1100 मीमी व्यसाच्या प्रिस्टेस पाईपची गळती काढण्यासाठी क्रॉस कनेक्शन करण्याचे काम सोमवारी रात्री हाती घेण्यात आले. मंगळवार 19 रोजी रात्री बुद्धीहाळकरनगर येथील क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण करण्यात आले. तर रात्री उशिरा साळोखेनगर पाण्याची टाकी येथील पाईप लाईन गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले. येथील गळती काढण्याचे काम बुधवार 20 रोजी रात्री उशिरा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

  पाईपलाईन गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील ए,बी आणि ई वॉर्डला तीन दिवस पाणीपुरवठा होवू शकणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र पाणीपुरवठा विभागाकडून काळंबावाडीची शेंडापार्क येथील पाणीपुरवठा केंद्राला जोडलेल्या पाईपलाईनमधून राजारामपुरी, कावळानाका परिसराला पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ावर फारसा परिणाम झालेला नाही. केवळ साळोखेनगर पाण्याच्या टाकीवर अवलंबुन असणाऱया परिसराचा पाणीपुरवठा ठप्प आहे. तर अन्यत्र पाणीपुरवठा सुरळीत आहे. आज रात्री उशीरा साळोखेनगर पाण्याची टाकी येथील पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर येथून ही पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

 

Related posts: