|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » धम्मविचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी श्रीमंत कोकाटे

धम्मविचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी श्रीमंत कोकाटे 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापुरातील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित दुसऱया राज्यस्तरीय धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे. रविवार 2 फेब्रुवारी 2020 रोजी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे. महाराष्ट्रातील धम्म चळवळीचे अभ्यासक, लेखक, विचारवंत, कार्यकर्ते या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत.

श्रीमंत कोकाटे हे महाराष्ट्रातील इतिहास शेत्रातील खूप मोठे संशोधक समजले जातात. त्यांनी आतापर्यंत 25 हून अधिक पुस्तके लिहली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम श्रीमंत कोकाटे गेल्या पंधराते वीस वर्षापासून करीत आहेत. संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आज पर्यंत बहुमूल्य अशा प्रकारचे कार्य केली आहे. आज तागायत जवळपास पाच हजारांहून अधिक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. त्यांची सामाजिक आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, दुसऱया धम्मविचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाच्या निमंत्रकपदी प्रा. करुणा मिणचेकर, सहनिमंत्रक डॉ. दयानंद ठाणेकर, प्रा. शोभा चाळके आणि विमल पोखर्णीकर हे आहेत.

Related posts: